अवैद्य रेती तस्करी करताना लोहारा रेतीघाटात पाच ट्रॅक्टर पकडले
दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- लाखनी तालुक्यातील चुलबंद नदीतून मोठ्या प्रमाणात अवैद्य रेतीची तस्करी सुरू आहे. यावर अंकुश लावण्यासाठी चक्क पालांदूर पोलिसांना समोर यावे लागले. पालांदूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे साकोली डिव्हिजन गस्त तसेच चेकिंग गुड मॉर्निंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चुलबंद नदीपात्राच्या लोहारा येथील रेती घाटातून लपून छपून रेती तस्कर रेतीचा उपसा करून ती रेती जास्त दराने विक्री करीता नेत असल्याच्या बेतात असल्याची माहिती पालांदूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पालांदूरचे ठाणेदार सतीश बन्सोड यांनी सापळा रचून नाल्यात रेती भरून असलेल्या पाच ट्रॅक्टरांना पकडून त्यांच्यावर पालांदूर पोलिस ठाणे येथे आणून कारवाई करण्यात आली.
मागील आठवड्यात बरसलेला अवकाळी पाऊस व सध्या पावसाचे वातावरण असल्याने महसुली कर्मचारी रात्री अपरात्री रेती घाटाकडे फिरकत नसल्याने रेती तस्करांची चांदीच चांदी आहे. नेहमी आपल्या साझावर फिरणारे महसूल कर्मचारी सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत असल्याने तस्करांसाठी रान मोकळे होते. यामुळे रेती तस्करांना कोणाचेही भय नसल्याप्रमाने बिनधास्त मध्यरात्रीला रेतीची तस्करी सुरू होती.
पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे लोहारा रेतीघाट परिसरामध्ये काही ईसम लपुन-छपुन अवैध रेतीचे उत्खनन करुन वाहतुक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार ठाणेदार सतीश बन्सोड यांचे अधिनस्थ अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने ९ जून रोजी सोमवारला मध्यरात्री १ वाजता दरम्यान लोहारा रेतीघाटावर छापा टाकला असता त्याठीकणी एकुण ५ वेगवेगळया ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसह अनुक्रमे एम एच १५ एच जी ४८२३ सिल्वर रंगाचा आयशर ३८० ट्रॅक्टर किं. ३ लाख ५० हजार रू व विना क्रमांकाची रेती भरलेली लाल रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली किं. १लाख रू व रेती अंदाजे एक ग्रास किं.६ हजार रूपये, दुसरी लाल रंगाची महिंद्रा बी २७५ ट्रॅक्टर क्र. एम एच ३५ ए जी ६४६९ किंमत ३ लाख रू व एम एच ३५ एजी २५४९ अर्धवट रेती भरलेली हिख्या रंगाची ट्रॉली कि.१ लाख रू व रेती अंदाजे अर्धा ब्रास किं. ३ हजार रुपये, तिसरी निळ्या रंगाची सोनालिका डी.आय ४२ आर एक्स विना क्रमांकाची ट्रॅक्टर कि. ३लाख रू. व विना क्रमांकाची लाल रंगाची अर्धवट रेती भरलेली ट्रॉली ची किं. १ लाख रू व रेती अंदाजे अर्धा ब्रास किंमती ३ लाख रूपये, चौथी निळ्या रंगाची सोनालिका ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ झेड ८८४८ किं. ३ लाख रू. व खाली असलेली विना क्रमांकाची ट्रॉली किं. २ लाख रूपये व पाचवी लाल रंगाची महिंद्रा ४७५ डी. आय. एस. पी. प्लस विना क्रमांकाचा ट्रॅक्टर किं. ३ लाख रू. व खाली असलेली लाल पिवळ्या रंगाची प्रत्येकी १ ब्रॉस नाल्याची रेती अवैधरित्या उत्खनन करुन वाहतुक करण्याच्या तयारीत आढळून आले.
घटनास्थळावरुन एकूण ५ ट्रॅक्टर व ५ ट्रॉली असा एकूण २१ लाख १२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात आरोपी ट्रक्टर चालक – निलेश शिवाजी मेश्राम (२७) रा. दिघोरी/ मोठी, चालक/मालक – प्रविण संजय हिंगे (२१) रा. सालेबर्डी, ता. साकोली, चालक/मालक मंगेश शिवराम कापसे (२२) रा. दिघोरी/मोठी, चालक – आकाशशालिक कांबळे (२४) रा. दिघोरी मोठी, चालक – नरेश रामरतन चवळे (४२) रा. दिघोरी मोठी, मालक – मनोज नारायन आगाशे, रा. दिघोरी मोठी, मालक – कार्तिक विकास कोटेवार, रा. दिघोरी मोठी, मालक – अंशुल शंकरराव खराबे, रा. दिघोरी मोठी यांच्या विरोधात पोलीस ठाणे पालांदूर येथे कलम ३०३(२) ४९,६२,३(५) भा.न्या.सं.सहकलम ७,९, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची कार्यवाही भंडाराचे पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हान यांचे मार्गदर्शनात पालांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश बनसोड, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे, पोलीस हवालदार मेश्राम, पोलीस चालक दिघोरे, गृहरक्षक दलाचे सोनकुसरे, यांनी केलेली आहे.