रावणवडी वन पर्यटन लवकरात लवकर सुरू करा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वन्यक्षेत्रा अंतर्गत च्या विविध अडचणी संदर्भात आज आम. नरेंद्र भोंडेकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या पूर्वी ३ जून रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांचा आढावा घेण्यात आला. ज्यात मुख्य म्हणजे रावणवडी वन पर्यटन लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. सोबतच वन्य प्राणी उपचार केंद्र व बचाव केंद्र सह मानव वन्य प्राणी संघर्ष उपाय योजना या संबंधी सुद्धा निर्देश देण्यात आले आहे.
उल्लेखनीय आहे की गेल्या ३ जून रोजी आम. नरेंद्र भोंडेकर यांनी येथील वन संरक्षक कार्यालयात वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊ शासन द्वारे मंजूर करण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेत काही निर्देश दिले होते आणि यावर सात दिवसात उत्तर देण्यास सांगितले होते. त्याचाच आढाव म्हणून आज आम. भोंडेकर यांनी पुनः बैठकीचे आयोजन केले. यात माटोरा जंगल मधील सहा गावे आणि सावरलाजंगलातील सहा गावे यांना चैन फेन्सिंग ला मंजूरी देण्यात यावी, रावणवडी वन पर्यटन करीता १८ कोटी, तर वन विभागाच्या कार्यालय बांधकाम करीत १५ कोटी चा निधीला मंजूरी देण्यात येणार असल्याची आम. भोंडेकर यांनी माहिती दिली.
या बैठकीत आम. भोंडेकर यांनी रावणवाडी वन पर्यटनाच्या कामांना गती देण्यासाठी सुचना दिल्या. ज्यात पर्यटन प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराची कामे तात्काळ सुरु करण्यात यावी, मंजुर पर्यटन आराखड्यानुसार भाग-१, भाग२ व भाग-३ जागेवर सिमांकीत करुन तारेच्या जळीच्या कुंपणाची कामे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तासवित करावीत. पर्यटन आराखड्यानुसार प्रस्तावित क्षेत्राचा कंटूर सर्व्हे पण करावा, सर्व्हेक्षणा दरम्यान सफारी करीता अतिरिक्त रस्त्याचे अलाईनमेंट करुन घ्यावे. साधारण रस्त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या वनक्षेत्रात २० ते २५ कीमी क्षेत्राची आखणी करावी, रावणवाडी जलशयाचे एफटीएल सीमा निश्चित करावी व त्यावर सीमेंट पिल्लर रोवून एफटीएल क्षेत्र वगळून इतर क्षेत्रावर आराखड्यानुसार कामांचे स्थळ निश्चित करावे.
पर्यटन प्रकल्पात साहसी क्रीडा प्रकाराचा समावेश कारण्यासाठी भाग-४ निश्चित करावा. त्यात हॉट एअर बोलून, पॅराग्लाईडींग, मोटार बाईक रायडिंग, मोटार बोटींग इत्यादि बाबींचा समावेश करावा. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल या प्रकारे निर्देश दिले. या बैठकीत वन विभागाचे नागपूर येथील विभागीय वन अधिकारी लक्ष्मी मॅडम, भंडारा चे उपविभागीय वन अधिकारी गणविर, सहाय्यक विभागीय वन अधिकारी निलख, आरएफओ विलास बेलखोडे सह समस्त वन अधिकारी उपस्थित होते.