ट्रिंकेट सापाच्या १७ अंड्यांमधून १७ पिले सुखरूप बाहेर

सर्प संशोधक विवेक बावनकुळे यांच्या प्रयत्नांना यश गराडा

दै. लोकजन वृत्तसेवा

लाखनी:- भंडारा जिल्ह्यातील गराडा येथील प्रवीण राघव जांभुळकर यांच्या घरी आढळलेल्या ट्रिंकेट सापाच्या १७ अंड्यांमधून १७ पिले यशस्वीरीत्या बाहेर आली आहेत. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही एक महत्वपूर्ण घटना आहे.

दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी ही अंडी आढळली होती. सर्पमित्र वेदांत बनकर यांनी संबंधित ठिकाणाहून ही अंडी सुरक्षितपणे गोळा केली. त्यानंतर सर्प संशोधक विवेक बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांच्या उबवणीची योग्य काळजी घेण्यात आली.

दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्व १७ अंड्यांमधून १७ पिले यशस्वीरीत्या बाहेर आली. अशा प्रकारे १७ पैकी १७ अंडी उबवण्यात १०० टक्के यश मिळाले. या संपूर्ण प्रक्रियेत सर्पमित्र वेदांत बनकर यांनी अंडी सुरक्षितपणे गोळा करण्याची जबाबदारी पार पाडली, तर सर्प संशोधक विवेक बावनकुळे यांनी अंड्यांच्या उबवणीसाठी आवश्यक काळजी घेतली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्व अंड्यांमधून पिले बाहेर येण्यास यश मिळाले.

सापाविषयी जनजાગृती करणे, त्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास करणे आणि वन्यजीव संवर्धनाला प्रोत्साहन देणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे.

या यशस्वी उबवणी प्रक्रियेचे श्रेय सर्प संशोधक विवेक बावनकुळे यांच्या प्रयत्नांना जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *