मनी लाँड्रिंगच्या भीतीेने ४.५५ लाखांची फसवणूक

भंडारा :- घरी कॉरंटाईन ठेवून मनी लाँड्रिंगचा खोटा गुन्हा दाखल असल्याची भीती दाखवून ४ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना भंडारा येथे घडली आहे.

प्राप्त तक्रारीनुसार, दि. २२ ऑगस्ट २०२६ ते २४ ऑगस्ट २०२६ दरम्यान मोबाईल क्रमांक ९०४१४६९१०९ व ७८८००९३००९ च्या वापरकर्त्याने फिर्यादीला फोन करून तुमच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा केस दाखल आहे, असे सांगितले. फिर्यादीला अरेस्ट ऑर्डरबाबत बनावट कागदपत्रे व्हॉट्सॲपवर पाठवून विश्वास संपादन केला.

नंतर आरटीजीएसच्या माध्यमातून एकूण ४ लाख ५५ हजार २०० रुपये आरोपीने दिलेल्या बँक खात्यात जमा करण्यास प्रवृत्त करून फसवणूक केली. फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे अपराध क्र. १२/२०२६ कलम ३१८(४) भा.न्या.सं. व ६६(सी), ६६(डी) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. संदीप एकाडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *