ऑनलाइन खरेदीमध्ये सावध राहा, सावज बनू नका – नितीन राठोड

दै. लोकजन वृत्तसेवा

साकोली :- सध्या देशभर सण उत्सवाची धूम असल्यामुळे व तालुक्यात मंडीच्या उत्साह जोरात असल्यामुळे प्रत्येक घराघरात ऑनलाइन खरेदी मोठ्या प्रमाणावर सुरू असून याच खरेदीच्या घाई गडबडीत सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांना फसवून घेतात त्यामुळे जनतेने ऑनलाइन खरेदी करताना सावध राहूनच खरेदी करावी सावज बनू नये ग्राहकाची ऑनलाइन खरेदी करताना लहानशी चूक मोठी हानी करून घेते त्यामुळे जनतेने सावध राहावे सावज बनू नये असे आवाहन साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन राठोड यांनी केले.

सन-उत्सव असो वा विविध सीजनच्या विशेष विक्री (फेस्टिव्हल ऑफर्स), ऑनलाइन खरेदीची धूम आणि आकर्षक सवलतींचा मोह नेहमीच नागरिकांना आकर्षित करत असतो. मात्र, या सगळ्यांच्या आडून सायबर गुन्हेगार नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याच्या तवारीत असतात. अविश्वसनीय सवलती, बनावट कूपन कोड आणि फसव्या वेबसाइट्सच्या माध्यमातून ग्राहकांना जाळ्यात ओढले जात असल्याने, ऑनलाइन खरेदी करताना नेहमीच सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. एका क्लिकवर मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता, साकोली पोलिसांकडून नागरिकांना ऑनलाइन व्यवहाराबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खेळणे, चप्पल, जूते, कपडे, किराणा सामान, हार्डवेअर, इलेक्ट्रॉन्स, मोबाईल, गृहपयोगी वस्तूंसह विविध उत्पादनांच्या ऑनलाइन खरेदीला नेहमीच मोठा वेग असतो. आणि आता सणासुदीचे दिवस असल्यामुळे तर ऑनलाइन खरेदीचा महापूर आलेला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म कडून निरनिराळ्या ऑफर जाहीर केल्या जातात. मात्र, याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगार हुबेहूब बनावट वेबसाइट्स तयार करतात. नामांकित कंपन्यांच्या संकेतस्थळांसारखी दिसणारी ही बनावट पेजेस ग्राहकांचा सहज विश्वास संपादन करतात. आकर्षक सवलतींचे आमिष दाखवून ऑनलाइन पैसे उकळले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *