अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, अहवाल लवकर यावा; देवेंद्र फडणवीसांची अमित शहांसमोर मागणी; कार्यक्रमात सुनेत्रा पवार भावुक, एकनाथ शिंदेही आठवणीने गहिवरले
दै. लोकजन वृत्तसेवा
पुणे :- अजित पवारांच्या अपघाताचा अहवाल लवकर समोर आला पाहिजे. लवकर अहवाल यावा यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील विनंती केली. अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करणार, असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर मुख्यमंत्री फडणविसांनी ही मागणी केली आहे. पुणे जिल्हा परिषद परिसरातील यशवंतराव चव्हाण भवन येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्ध्यापुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारसह अजित दादांच्या आठवणींना उजाळा देत सारेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.







