खा. प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

भाजप, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

दै. लोकजन वृत्तसेवा

मोहाडी :- दि. १६ सप्टेंबर रोजी खा. प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी जनसंपर्क कार्यालयात मोहाडी तालुक्यातील भाजपाचे व काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल पटेल साहेब यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. प्रफुल पटेल, खा. राजेंद्र जैन, आमदार राजुभाऊ कारेमोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश करण्यात आले.

पक्ष प्रवेश प्रमुख उपस्थितीत, खासदार राजेंद्र जैन, विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे, तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, शहर अध्यक्ष पवन चव्हाण, विजय पारधी, रिता हलमारे, उपसभापती देवा चकोले महादेव पचघरे, हैशोक शरणागते, यांची उपस्थिती होती. मोहाडी शहरातून भूषण गभने, अफरोज पठाण, नगरसेवक यादोराव कुंभारे यांच्या नेतृत्वात मोहाडी शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केले. तसेच मोहाडी पंचायत समिती माजी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यां समवेत पक्ष प्रवेश केला. तसेच नानाभाऊ पटोले यांचे खंदे समर्थक आकाश काकडे यांनीही शेकडो कार्यकर्त्या सोबत पक्ष प्रवेश केला. यामुळे निश्चितच मोहाडी तालुका पक्ष वाढीसाठी फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *