गोबरवाही पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १० जणांना अटक २ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- पोलीस स्टेशन गोबरवाही हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून १० जुगाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईत रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि तीन मोटरसायकली असा एकूण २ लाख २२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन गोबरवाही अंतर्गत मौजा पाथरी येथे ५२ तास पत्त्यावर पैशाची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळ सुरू असल्याची गुप्त माहिती फिर्यादी पो.शि. शेळके, पो.स्टे. गोबरवाही यांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकली असता आरोपी रविंद्र ताराचंद मालाधारी (वय ५२), करण युवराज धमगाये (वय ४२), कमलेश मनोज कापगते (वय ३०), देवराज वाल्मीक कोहळे (वय ३०), आशुतोष केसरीलाल पुष्पतोडे (वय २५), अमोद तुंडीलालजी सांगोळे (वय ४३), अतुल विनोद राऊत (वय २३), रविंद्र चौतराम पुष्पतोडे (वय ३८), निलेश मनोज कापगते (वय २०), सर्व रा. पाथरी, ता. तुमसर व विजय चिंतामण डोंगरे (वय ४९), रा. नाकाडोंगरी, ता. तुमसर हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्या ताब्यातून अंगझडतीत मिळालेले १७६० रुपये, फळावरील ३२० रुपये, तासपत्ती, हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मो.सा. क्रं. एम.एच. ३६ ए.एफ. ८०२३ अंदाजे किं. ६५ हजार रुपये, हिरो कंपनीची स्पलेंडर प्लस मो.सा. क्रं. एम.एच. ३६ ए.डि. ८७०५ अंदाजे किं. ७५ हजार रुपये, टि.व्ही.एस. कंपनीची स्पोर्ट मो.सा. क्रं. एम.पी. २२ झेड.जि. ४९४७ अंदाजे किं. ८० हजार रुपये असा एकूण २ लाख २० हजार रुपयांच्या गाड्या आणि रोख मिळून एकूण २ लाख २२ हजार १०० रुपयांचा जुगाराचा माल मुद्देमाल म्हणून जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अपराध क्रमांक ४७१/२०२६ कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, स.पो.नि. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनात पो.शि. शेळके, पो.हवा. रहांगडाले, पो.स्टे. गोबरवाही यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन गोबरवाहीचे अधिकारी करीत आहेत.








