तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची-जिल्हा शल्य चिकित्सक संदीप गजभिये
जिल्हा परिषद सभागृहात तंबाखूमুক্ত आरोग्य संपन्न कार्यशाळा
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा: तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न शाळा कार्यक्रम हा राष्ट्रीय कार्यक्रम असून समाजसेवेचे कार्य आहे. मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ नये व या जीवघेण्या व्यसनाकडे आकर्षित न होता व्यसना पासून दूर राहण्यासाठी शिक्षकांनी दररोज तंबाखूचे दुष्परिणाम निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तंबाखूमुळे विविध प्रकारचे आजार होतात. याबद्दल मार्गदर्शन करून आरोग्य संपन्न शाळा करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन संदीप गजभिये जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांनी केले.
शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था आणि सलाम मुंबई फाऊंडेशन च्या वतीने जिल्हा परिषद सभागृहात जिल्हास्तरीय तंबाखूमুক্ত आरोग्य संपन्न शाळा एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला प्रमुख अतिथी, आमच्यकडे डॉक्टर संदीप गजभिये जिल्हा शल्य चिकित्सक, डॉक्टर नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रवींद्र सोनटके, शिक्षणाधिकारी माध्यमिक, राजेश रुद्रकार, प्राचार्य डायट, अभिराम मेहंदळे, संदीप गावडे, प्रतिनिधी सलाम मुंबई फाउंडेशन, मोहन उशिरे गटशिक्षणाधिकारी, राहुल बाबा उपशिक्षणाधिकारी, शिल्पा निखाडे, श्रीकांत पेंदाम, शरद कुकडकर, गटशिक्षणाधिकारी, डॉक्टर महेश बत्रा, शैलेश कुकडे उपस्थित होते.
याप्रसंगी शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटके यांनी तंबाखू मुक्तीचे भरीव कार्य असून ही चळवळ बालवयापासून सुरू करून विद्यार्थ्यांना या व्यसनापासून दूर ठेवले पाहिजे असे प्रतिपादन केले. राजेश रुद्रकार यांनी शिक्षकांनी प्रत्यक्षात तंबाखूमুক্ত असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये मोठी शक्ती आहे व या शक्तीचा वापर शिक्षकांना करता आला पाहिजे. तंबाखूमुळे आर्थिक नुकसान सुद्धा होते. याची जाणीव समाजाला, विद्यार्थ्याला करून देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन केले.
प्रतिबंधक कायदे, आरोग्य स्वच्छता, पोषण, इत्ता सातवी, आठवी, नववी साठी उपक्रम, तंबाखू मुक्त शाळेचे नऊ निकष, तंबाखू मुक्त शाळा प्रशिक्षण भूमिका व जबाबदारी, बालपण विद्यार्थी नेतृत्व, पुढील नियोजन, ॲप याबद्दल माहिती, प्रश्नोत्तर व अभिप्राय या महत्त्वाच्या विषयावर संजय ठाणगे, अभिराम मेहंदळे, संदीप गावडे, शैलेश कुकडे, मनिष बत्रा, महेश जगनिक यांनी मार्गदर्शन केले. सर्व पाहुण्यांना मार्गदर्शन पुस्तिका भेट देण्यात आली. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी गरीमा प्रधान, आरती कातुरे यांनी सहकार्य केले. कार्यशाळेचे संचालन महेश जगनिक यांनी केले. प्रास्ताविक व आभार चेतन बोरकर यांनी केले.








