चिचगाव सराटी येथील मयूर कोल्हे एमपीएससी महाराष्ट्र संयुक्त गट ‘ब’ संवर्गात राज्यात दुसरा

दै. लोकजन वृत्तसेवा

साकोली :- तालुक्यातील छोट्याशा चिचगाव (सराटी) येथील गट ग्रामपंचायत असलेला व जंगलव्याप्त भागात राहणारा मयूर उद्दल कोल्हे याची एम पी एस सी मध्ये गट ब या परीक्षेत कुठलीही महागडी कोचिंग न लावता फक्त स्वतःच्या मेहनत व जिद्दीने एम पी एस सी ला गवसणी केली असून त्याच्या राज्यात दुसरा क्रमांक आला आहे.

एमपीएससी कडून २०२५ मध्ये महाराष्ट्र संयुक्त गट ब मध्ये घेण्यात आल्या होत्या त्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकावर परीक्षा उत्तीर्ण केली असून मयूरच्या नियुक्ती बद्दल अभिनंदन वर्षाव होत आहे. मयूर ने या पदावर भरारी घेताना कोणतीही महागडी व खाजगी शिकवणी घेतली नाही फक्त जिद्द व मेहनततीच्या भरोशावर माझी नियुक्ती झाली असून मी सब रजिजर या पदावर नोकरी करीन अशी इच्छा मयूर ने बोलून दाखविली. असून सब रजिस्टार ग्रेड १ तथा विक्रीकर विभागात निरीक्षक म्हणून त्याची निवड झाली असून एकाच वेळी दोन पदावर मयूरच्या नियुक्तीमुळे कुटुंबासहित गावात व परिसरात आनंदाचा वातावरण

असून त्याने केलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळालyाच्या आनंद सुशील कोल्हे यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

मयूर कोल्हे च्या या नियुक्तीवर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सिंह बैस, पत्रकार संघाचे सचिव सुनील जगिया, संतोष कोरे, शाहिद कुरेशी, प्रा. प्रशांत शिवणकर, नाझीम पाशाभाई, सुदाम हटवार यांनी मयूरचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *