पत्रकार परिषदेनंतर सत्यजीत तांबेंकडून मित्रत्वाचा सल्ला, पण कमेंट बंद; रोहित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
दै. लोकजन वृत्तसेवा मुंबई:- आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी रोहित पवारांना मित्रत्वाचा सल्ला देत असल्याचे सांगत भलीमोठी फेसबुक पोस्ट केली. त्यामध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मैत्रीचा दाखला देत रोहित पवार यांनी केलेल्या आरोपावरुन त्यांच्यावर टीका केली होती. मोठा नेता होण्याची इतकी घाई चांगली नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला होता. आता, सत्यजीत तांबे यांच्या पोस्टवर रोहित पवारांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली.







