शिवसेना उबाठा तर्फे शायना एन सी विरोधात तीव्र निषेध आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- मुंबई येथील गद्दार सेनेच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी या देशातील लाखो, करोडो हिंदूंचे, शिवसैनिकांचे दैवत असलेले वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा छायाचित्र फाडण्याचा महापाप केला, त्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय चौकामध्ये निषेध आंदोलन करण्यात येऊन या शायना एनसी वर राष्ट्रपुरुष बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला करण्यात आली.

मुर्दाबाद मुर्दाबाद शायना एनसी मुर्दाबाद, विजय असो विजय असो शिवसेना प्रमुखांचा विजय असो, या शायना एनसी चे करायचे काय, खाली डोके वरती पाय अशा घोषणा देऊन शायना एन सी च्या छायाचित्राला चपलेने, जोड्याने बडवून काढत तिचे फोटो फाडून शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या आजच्या या निषेध आंदोलनामध्ये जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, युवासेना जिल्हा अधिकारी श्रीकांत मेश्राम, उपजिल्हाप्रमुख किशोर तलमले, किशोर चन्ने, प्रकाश पारधी तालुकाप्रमुख तिलक सार्वे, प्रमोद मेश्राम, दिनेश नंदपुरे, विनोद ढोरे, ईश्वर भोयर, ज्ञानेश्वर बावनकर, प्रवीण गायधने, शहर प्रमुख राकेश आग्रे, मयूर जोशी, प्रशांत देशमुख, प्रवीण गुमा, गुनू राऊत, विनायक सरोदे, प्रकाश गभने, हर्षल टेंभुरकर, भास्कर बेंदरकर, दलिराम भुते, रसिक खोब्रागडे, हिमांशू भाजीपाले, धर्मेंद्र ढोमणे, अमित हटवार, राज वधवाणी, संतोष चौदेवार, अतुल भिरासे, शामराव मालखंडाळे, संजय झांजाळ, नरेंद्र नान्हे, सोमेश्वर सेलोकर, विलास बुरडे, सुनील सोमनाथे, अरविंद भुरे, शेखर वाघमारे, राजेश नान्हे, गुलचंद धुळसे, सचिन ठवकर, होमराज उपरीकर, निवृत्ती गभणे, शैलेश खोब्रागडे, हनुमान शेंडे, देवानंद निमजे, यश पारधी, विश्वजीत पांडा, संकेत कोसरे, ज्ञानेश्वर बारस्कर, सकाश समरीत, पितांबर खंडाटे, प्रवेश बनसोड, विशाल भुरे, कुंदन मलेवार, जयदेव होपणमुंडे, योगराज कायदे इत्यादी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *