… ही तर पूरग्रस्तांची थट्टाच!

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- धरणाचे बॅक वॉटर आणि नदीच्या पुरामुळे भंडारा जिल्ह्यातील नदीकाठावरील गावे तसेच भंडारा शहारलगतच्या लोकवसत्यामध्ये पुराचे पाणी शिरल्याने लोकांचे लाखोचे नुकसान झाले. मात्र सरकारकडून पूरग्रस्त नागरिकांना केवळ पाच हजारावर बोळवण करण्यात आली.त्यामुळे ही मदत म्हणजे पूरग्रस्त नागरिकांची थट्टाच असल्याची लोकांची तीव्र भावना आहे. जिल्ह्यात दि.११व १२ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाने नदी,नाले आणि धरणे तुडुंब भरले. आणि धरणातील पाण्याचे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीची २४५.५० मी. जलसाठा पातळी ओलांडून भंडारा शहारानजीकच्यागणेशपूर व भोजापूर नाल्यालगतच्या सत्कार नगर, नेहरू वॉर्ड, छत्रपती शाहू नगर, महात्मा फुले कॉलोनी इत्यादी लोक वसाहातीला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला. त्यामुळे दोन ते तीन दिवस पुरपीडित लोकांना बेघर व्हावे लागले.

पाच हजारावर बोळवण

पूर ओसंरल्यानंतर दि.१३ सप्टेंबर रोजी पुरपीडिताना सरकारी मदत देण्यासाठी प्रशासनाने पूरग्रस्त भागातील बुडीत घरांचे पंचनामे केले होते. गत आठवड्यात विधानसभेचे बिगुल वाजण्यापूर्वी काही पुरपीडितांच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा झाले. तर काहींच्या खात्यात छदामही आले नाही.त्यामुळे दोन दिवस पुराच्या पाण्याने अन्न, धान्य दैनंदिन गरजाच्या वस्तू व सामनासह इतही लाखों रुपयाचे नुकसान झाले. मात्र सरकारने केवळ पाच हजार नुकसान भरपाई दिल्यामुळे पूरग्रस्त नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

त्या पूरग्रस्तांची दुहेरी चांदी

भंडारा शहारातील पूर प्रभावित क्षेत्रातील काही लोकांना घराचा मोबदला दिला आणि ऐच्छिक पुनर्वसन करून घरे संपादित केली. मात्र लोकांनी मोबदला घेऊनही घरे सोडली नाही. अनेकांनी सरकारजमा झालेल्या घरात भाडेकरू ठेवले. काही लोकांनी पुनर्वसनात सरकारने संपादित केलेल्या घरांची रजिस्ट्री होत नाही. त्यामुळे संपादित झालेली बुडीत घरे नोटरी करून परस्पर दुसऱ्यांना विकले. त्यामुळे ही बुडीत वस्ती जैसे थे असून दरवर्षी येणाऱ्या पुरात ही घरे पुन्हा पुन्हा बुडतात आणि अश्या नकली पुरबुडीतांना वारंवार आर्थिक मदत दिली जात असून खरे पूरग्रस्त मात्र लाभापासून कायम वंचित राहतात.

अलीकडेचे सोडले, पलीकडचे संपादित झाले

बॅक वाटरच्या धोका पातळीलागतची असलेल्या एकाच वस्तीतील रस्त्याच्या पलीकडच्या कुटुंबाचे ऐच्छिक पुनर्वसन केले, मात्र रस्त्याच्या अलीकडे घरे सोडले.त्यामुळे पुराच्या पाण्यात अडकणाऱ्या लोकांची ना धड इधर ना धड उधार अशी दयनिय अवस्था झाली आहे.