निवडणुकी विषयक कार्य कक्षाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- विधानसभा निवडणूक कार्यासाठी नियोजन भवनाच्या तळमजल्यावर एकत्रित कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामध्ये आचारसंहिता कक्ष, तसेच माध्यम प्रमाणीकरण कक्ष तसेच १९५० कक्ष आणि सी व्हिजील कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये आज जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत पिसाळ, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे तसेच जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कक्षांनी समन्वयाने काम करण्याचे सूचना दिल्यात.