कैलास कुरंजेकर यांची नागपूर विभागीय शिक्षण मंडळावर सदस्यपदी नियुक्ती

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- कैलास कुरंजेकर यांची नागपूर विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर सदस्य (बोर्ड मेंबर) म्हणून नियुक्ती महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केली. श्री कैलास कुरंजेकर हे नूतन कन्या शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय भंडारा येथे उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल न्यू गर्ल्स स्कूल भंडारा चे अध्यक्ष ॲडव्होकेट एम. एल. भुरे, सचिव शेखर बोरसे, कार्यकारिणी सदस्य सौ. रेखा पनके, प्रमोद पनके, सौ. सीमा चित्रीव तसेच प्राचार्य निलू तिडके यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या नियुक्ती प्रित्यर्थ शाळेच्या प्राचार्य सौ. निलू तिडके यांनी श्री कैलास कुरंजेकर यांचा सप्तनिक शाळेत श्रीफळ व रोपटं देऊन सत्कार व अभिनंदन केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व ही नियुक्त शाळेसाठी अभिमानास्पद बाब असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक सौ. श्रद्धा रामेकर, सौ. प्रिया ब्राह्मणकर त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते त्यानी सुद्धा अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. श्री कैलास कुरंजेकर यांनी आपल्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र शासनाचे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. एम. एल. भुरे, सचिव शेखर बोरसे तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. निलू तिडके यांचे आभार मानले.