हरियाणाच्या निकालानंतर ठाकरे गटाला अचानक बळ आलं, आता काँग्रेसचे नेतेही अडून बसले, मविआचं जागावाटप लांबणार

हरियाणाः- विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीत तणातणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरुन बिनसल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच ही धुसफूस सुरू असतानाच दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जागावाटपावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या दबावाखाली झुकणार नाही, असं दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सांगितलं आहे. मविआत जागावाटपावरुन तिढा कायम आहे. एकीकडे संजय राऊतांनी सांगितलंय की, केवळ दोन-तीन जागांवर मतभेद आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच्या चर्चां दबक्या आवाजात सुरू आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भांतील जवळपास १२ जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तिढा कायम आहे. तसेच, काही मुंबईतील जागांसाठीही ठाकरे गट आणि काँग्रेस आग्रही आहे. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांची दिल्लीवारी सुरू आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाच्या दबावाखाली काँग्रेस झुकणार नाही, अशी स्पष्ट भूमिका दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. ज्याप्रकारे लोकसभेत सामंजस्याची भूमिका घेतली, आघाडी धर्म पाळला आपण, कमी जागा घेतल्या, पण यंदा लोकसभेचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर ज्या जागांवरती आपला कँडिडेट १०० टक्के निवडून येऊ शकतो, जिथं मुस्लिम वोटर्स खूप जास्त आहेत, अशा जागा आपण सोडायच्या नाही, असा पवित्रा काँग्रेसनं घेतला आहे. ज्या जागांसाठी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे, अशाच जागांसाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. त्यामुळे काँग्रेसनं स्पष्ट भूमिका घेतली असून दबावतंत्राखाली यावेळेस झुकायचं नाही. लोकसभेला आपण माघार घेतली मात्र यंदा आपल्या सोबत जनता आहे किंवा महाविकास आघाडीसोबत जनता आहे. प्रामुख्यानं काँग्रेसला जास्तत जास्त जागा मिळाव्यात हा प्रयत्न आपण करतोय आणि त्या निश्चित मिळवून घेऊ, अशा प्रकारच पवित्राही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसनं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यांनंतर शिवसेनाठाकरे गट काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.