नागपूरच्या सराईत गुन्हेगारांकडून ८ मोटार सायकलींसह ११ लाख ४० हजारांचा माल जप्त;गुन्हा दाखल

गोंदिया:- गोंदिया जिल्ह्यातून आणि जिल्ह्या बाहेरून मोटारसायकली चोरणाऱ्या २ सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा आणि तिरोडा पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून १८ मोटार सायकली,असा एकुण ११ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.विक्की वसंता रामटेके (वय २७, रा. मंगळवारी पेठ, उमरेड, जि.नागपूर) आणि विक्रम रामेश्वर उके (वय ४२, रा.नारायण नगर, मोहम्मद लेआउट, उमरेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दुचाकी चोरण्यासाठी सराईत गुन्हेगार विक्की रामटेके हा रेल्वेमार्गाने ये-जा करायचा आणि बसस्थानक, न्यायालय, आठवडी बाजार, पार्किंग आदी गदर्ीच्या मोटार सायकल आणि आरोपींना तिरोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक करीत आहेत. ठिकाणी उभ्या असलेल्या मोटारसायकली चोरायच्या आणि चोरीच्या मोटारसायकलची नंबर प्लेट बदलून बनावट आरसी लावायचा. मोटारसायकल तयार करण्यासाठी आणि विकण्यासाठी वापरला जातो.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हेगारांची पद्धत, जिल्ह्यात घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचे तांत्रिक विश्लेषण करून चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे.जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक गोरख भामरे,अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाने वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्याची गुप्त माहिती मिळविली. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्या कारवाया,तांत्रिक बाबी, गुन्हेगारी नोंदी पडताळणी यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मोटार सायकल चोरीच्या समांतरतपासात वरील आरोपी तिरोडा येथे दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.