धान खरेदीसाठी २१ केंद्रावर ऑनलाईन नोंदणी सुरु

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२४-२५ करिता धान खरेदी करीता शासनाचे BeAM पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे. तरी संबंधीत शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फफोटो अपलोड करणेसह, चालु हंगामाचा पिकपेरा असलेला सातबारा उतारा, नमुना ८ अ, अद्यावत बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे घेवून तालुक्यातील जवळच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी पुर्ण करावी व शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले आहे. नोंदणी साठी केंद्र संस्थांची नावे बॉक्समध्ये आहेत. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जाहीर आवाहनकरण्यात येते की, पणन महासंघाच्या “”अ” वर्ग सभासद संस्था असलेल्या संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी हंगाम २०२४-२५ मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी करावी. जेणेकरून हंगाम २०२४-२५ मध्ये धान खरेदी करता येईल, असे जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी कळविले आहे.