विभागीय शालेय टारगेट बॉल क्रीडा स्पर्धेत गांधी विद्यालय प्रथम

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :-भंडारा तालुक्यातील गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पहेला येथे १९ ऑक्टोबर २०२४ ला १७ व १९ वर्षीय विभागीय शालेय टारगेट बॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात १७ वर्षी मुले, मुली प्रथम क्रमांक तसेच १९ वर्षीय मुली प्रथम क्रमांक प्राप्त केलेत. त्यांची राजस्तरीय स्पर्धे करिता निवड झाली. शालेय टारगेट बॉल स्पर्धत खेळाडू विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल गांधी विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. आनंद जिभकाटे, संस्था सचिव रामदास भाऊ शहारे यांनी दूरध्वनी द्वारे खेळाडूंना कौतुक करून राजस्तरीय स्पर्धे करिता शुभेच्छा दिले. विद्यालयावतीने प्राचार्य वाय. एन काटेखाये व शिक्षकांनी अभिनंदन केलेत. या स्पर्धेसाठी स्पर्धा नियोजन अधिकारी गायकवाड क्रीडा अधिकारी भंडारा, तसेच डी. बी. टेकाम क्रीडा शिक्षक, अमित रामटेके, दिनेश पंचबुधे, अमन सूर्यवंशी, स्मित रेहपाडे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले .