मैदान तेच, उमेदवारही तेच, कर्जत-जामखेडमध्ये पुन्हा रोहित पवार विरुद्ध राम शिंदे सामना रंगणार

मुंबईः- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत ९९ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये भापजनं कर्जतजामखेडमधून पुन्हा राम शिंदे यांनी संधी दिली आहे. त्यामुळं कर्जत जामखेडमध्ये पुन्हा रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असाच सामना रंगणार आहे. तिथं मैदान तेच, उमेदवारही तेच अशीच लढत होणार आहे. त्यामुळं यावेळी कोण बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यासाठी भाजपने इतर पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. भाजपने आज ९९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये कर्जत जामखेडमध्ये पुन्हा राम शिंदेंना संधी देण्यात आली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे आव्हान असणार आहे. रोहित पवार यांची या मतदारंसघातून जवळपास उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळं पुन्हा या दोघांमध्येच विधानसभेचा सामना रंगणार आहे.