भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर;विजय रहांगडाले,विनोद अग्रवाल व संजय पुराम यांना संधी

गोंदियाः- भारतीय जनता पक्ष कडून विधानसभा निवडणुकी करिता उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.तसेच भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठी मधून, तर पुणे जिल्ह्यातील कोथरूड विधानसभेतून चंद्रकात पाटील, नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले आणि नाशिक पश्चिम तून सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातील एकाही मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार विजय रहागंडालेंना तिसऱ्यांदी संधी देण्यात आली.तर गोंदिया विधानसभा मतदार संघातून विद्यमान अपक्ष आमदार विनोद अग्रवाल तसेच आमगाव- देवरी मतदार संघातून माजी आमदार संजय पुराम यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर जिंतूर मधून मेघना बोडर्ीकर,धुळे शहरमधून अनुप अग्रवाल भोकरदान मधून संतोष दानवे, राम कदम आदींना उमेदवारी देण्यात आली आहे.बल्लारपूर येथून सुधीर मुनगंटीवार यांना उमेद्वारी जाहीर करण्यात आली आहे.