तृप्ती हातेल जिल्हास्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेत तृतीय

मोहाडी :- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ माझी माय सरसोती भंडारा च्यावतीने जागतिक अहिंसा दिना निमित्त ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा (गांधीजीच्या जिवानावर आधारित) आयोजित केली होती. यामध्ये सरस्वती महिला कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येतील तृप्ती विलास हातेल या विद्यार्थीने तृतीय क्रमांक पटकाविला. या गुणवंत विद्यार्थीनीचे अभिनंदन संस्थाध्यक्ष अभिजीत वंजारी, विद्यालयाच्या प्राचार्या सुषमा वंजारी, मराठी विषयाचे प्राध्यापक नरेंद्र गायधने आणि विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन अभिनंदन करण्यात आले, व पुढील भविष्याच्या उज्वल वाटचालीकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.