अनु. जाती निवासी शाळा राजेदहेगाव लोकनृत्य स्पर्धेत विभागात प्रथम

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दिनांक १७ ऑक्टोंबर रोजी शिक्षण विभाग मार्फत आयोजित विभागीय लोकनृत्य स्पर्धा नागपूर येथे पार पडल्या. त्यामध्ये अनु. जाती व नवबौद्ध मुलींची निवासी शाळा राजेदहेगाव जिल्हा भंडारा यांनी विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. पुढील महिन्यात पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ही शाळा नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी मुले व मुली यांच्यासाठी संधीची समानता या विषयावर लोक नृत्य सादर करण्यात आले. यामध्ये अपेक्षा रंगारी, प्रियांशी मेश्राम, स्नेहा गायकवाड, पूर्वाई रंगारी, मधुरा साळवी यांनी अप्रतिम लोकनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रशिक्षक कृणाली धकाते यांनी काम बघितले. यावेळी डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, मेंढे मुख्याध्यापक यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.