मविआच्या भर पत्रकार परिषदेतच नाना पटोले संजय राऊतांवर संतापले; देसाई अन् आव्हाडांनी सावरले

मुंबई:- महाविकास आघाडीमधील कालच्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात तू तू मै मै झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यानतंर, १८ ऑक्टोंबर रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मविआच्या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष पार पाडण्यासंदर्भांत चर्चां केली. त्यानंतर, शिवसेनेच्या शिवालय जनसंपर्क कार्यांलयात पत्रकार परिषद घेऊन नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, मविआ नेत्यांची ही पत्रकार परिषद चर्चेत राहिली ती, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या विसंवादामुळे. संजय राऊत हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांबद्दलची नाराजी उघड केली. त्यामुळे, पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने ११९८६-७५ अशा पद्धतीने जागावाटप करायचे ठरवल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र, महाविकास आघाडीत विदर्भांतील जागावाटपावरुन बिघाडी झाल्याचे समजते. नाना पटोले व संजय राऊत यांच्यात विसंवाद वाढल्याने आपण थेट काँग्रेसच्या दिल्लीकर नेत्यांशी बोलणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, १८ ऑक्टोंबर रोजीच्या पत्रकार परिषद नाना पटोले यांनी संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे,असे म्हणत मविआतील वाद थेट पत्रकार परिषदेतून मांडल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे नेते अनिल देसाई हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यावर, देसाई यांनी ते तसं नाही, म्हणत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.