भारतीय राज्यघटना अतिशय उत्तम – प्रा. श्याम मानव

सडक अर्जुनी:- सध्या केंद्रात व राज्यात भारतीय राज्यघटनेची पायमल्ली होत असून एस सी,एस.टी, ओबीसी वर अन्यायकारक निर्णय घेतल्या जात आहेत. भारतीय राज्यघटना अतिशय उत्तम असून त्याची अंमलबजावणी केल्यास स्वातंत्र, समता, बंधुता व सामाजिक न्याय असे मूल्य लोकांमध्ये रुजल्यास देशाची खरी प्रगती होऊ शकते. रिजर्वेशन खत्म केले जात आहे. अवैद्य पद्धतीने देशात, राज्यात सरकार आणली जात आहे. बेकारी वाढलेली आहे. देशावर व राज्यावर कोट्यावधीचे कर्ज आहे. उद्योगपतीची सरकार आहे. ही गोरगरिबांची सरकार नसून या सरकारला राज्यातून उचलून फेकले पाहिजे तसेचभारतीय राज्यघटना अतिशय उत्तम असून ते अमलात आणण्याची गरज आहे असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निमर्ूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी आशीर्वाद सभागृहात “लोकशाही पुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान करतांना आपले मत मांडले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने संविधान विषयाचे तज्ञ अभ्यासक,राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते तथा संस्थापक संघटक सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा.श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम स्थानिक आशीर्वाद लॉन येथे गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर व्याख्यानाला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा डॉ.रीता अजय लांजेवार होत्या. कार्यक्रमाला बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय संस्थापक तथा प्रसिद्ध विचारवंत दशरथ मडावी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संपूर्ण अभियान प्रमुख सुरेश झुरमुरे,अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गोंदिया जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे, भंडारा जिल्ह्याचे संघटक डी.जी रंगारी, ओबीसीसंघर्ष कृती समितीचे तालुकाध्यक्ष दिनेश हुकरे, अंनिसचे तालुका संघटक मनोहर डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा.श्याम मानव यांनी “संविधान बचाओ -देश बचाओ ‘या विषयावर विस्तृत व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल मेश्राम यांनी केले तर आभार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका सचिव आर. व्ही. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व तालुक्यातील विविध सामाजिक संघटनानी सहकार्य केले.