तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा

 दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याची बैठक जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुध्दे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्या सुचनेनुसार व प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीचे आयोजन तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड व तालुका कार्याध्यक्ष आरजु मेश्राम यांनी केले होते. आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला समर्थन देण्याचा ठराव भंडारा तालुका कार्यकर्त्याकडून एकमताने घेण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला भंडारा विधानसभेकरीता उमेदवार देण्यात यावा अशी मागणी भंडारा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्याकडून वरीष्ठांना करण्यात आली. परंतु महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात येईल असे भंडारा तालुका कार्यकर्त्याच्या बैठकीत ठरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये सर्वश्री यशवंत सोनकुसरे, सौ. रत्नमाला चेटुले, प्रभाकर बोदेले, किर्ती गणविर, रुपेश खवास, नागेश भगत, वामन शेंडे, जनराज मस्के, होमदास वरठे, महेश निंबार्ते, मंगेश रेहपाडे, नरेश येवले, सुनिल भोपे, शालिक कागदे, रजनिश बन्सोड, उत्तम कळपाते, विकेश मेश्राम, संजय लांजेवार, बंडु चेटुले, महेश जगनाडे, सारंग घारगडे, विलास खांदाळे, विजय ईश्वरकर, हिरामण साठवणे, निरज शहारे, मदन भुरले, योगराज येलमुले, अरुण मेश्राम, सुभाष तितिरमारे, राजेश डोरले, संघमित्र चव्हाण, प्रेम तुमसरे, रामरतन वैरागडे व फार मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.