निवडणूक लढतांना कार्यकर्त्यांचा आदर होईल-आ. नरेंद्र भोंडेकर

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आज राज्यात युती ची सरकार आहे, त्यात आम्ही सुद्धा आहो आणि विधानसभेच्या विकासा करीत या सरकारने कोणताही निधी कमी पडू दिले नाही. म्हणून या युती सरकारचा आम्ही आदर करतो. परंतु निवडणूक लढतांना आम्ही कार्यकर्त्यांच्या भावनांचा सुद्धा आदर करू याची हमी आम. नरेंद्र भोंडेकर यांनी दिली. ते शिवसेना (शिंदे गटा) च्या कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करीत होते. निवडणूक घोषित झाल्या नंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे या दृष्टीने आज येथील विवाह सेलेब्रेशन येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला संबोधित करतांनाआम. भोंडेकर पुढे म्हणाले की, माझा आमदार म्हणून पहिला कार्यकाळ २००९ होता आणि तो संपूर्ण शिकण्यातच गेला. त्या नंतर २०१४ मध्ये अपक्ष म्हणून लढलो आणि पराजित झालो. निवडणूक हरलो म्हणून माझे मनोबल हरले नाही. आणि लोकांसारखे विधान सभा सोडली नाही. उलट अधिक जोमाने लोकांची कामे केली आणि २०१९ मध्ये त्याचे फळ मिळाले आणि विजयी झालो.

अनुभव असल्याने आज भंडारा पवनी दोन्ही तालुक्यातील विकासाचा आराखडा नगरिकांसमोर आहे. या विकासामुळे भविष्यात २९ हजार पेक्षा अधिक रोजगारनिर्माण होवू शकणार असल्याचे आम. भोंडेकर ही म्हणाले. या विकासात राज्यातील युती सरकारने भरपूर साथ दिले आणि तिन्ही पक्षाचे आम्ही आदर करतो आणि पक्षाशी निष्ठा ही ठेवतो. परंतु तृतीय निवडणुकीत लढतांना कार्यकर्त्यांच्या भावन दुखवणार नाही याकडे सुद्धा लक्ष ठेवण्यात येईल आणि कोणत्याही प्रकारे निवडणुका लाढण्यात येण्याची घोषणा आज आम. भोंडेकर यांनी केली. या वेळी मंचावर जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उप जिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, लोकसभा समन्वयक संजय कुंभलकर, शहर प्रमुख मनोज साकुरे, डॉ. अश्विनिताई भोंडेकर, महिला जिल्हा प्रमुख सविताताई तुरकर, आशाताई गायधने सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.