डॉ. पूर्णचंद्र वंजारी चे महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सुयश

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या घेण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी (राजपत्रित),२०२३ च्या परीक्षेत सिविल लाइन्स भंडारा येथिल रहीवासी प्रा.सुरेश मारोतराव वंजारी यांचे चीरंजीव डॉ पूर्णचंद्र वंजारी यानी महाराष्ट्र ातुन खुल्या प्रवर्गातून १७ क्रमांकावर यश संपादन केले आहे. लोकसेवा आयोगाने नुकतीच त्यांची नियुक्ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) नागपूर येथे मेडिकल ऑफिसर राजपत्रित अधिकारी म्हणून केली आहे. डॉ. पूर्णचंद्र ची मेडिकल कॉलेजला नोकरी करायची इच्छा होती. त्यांनी अथक प्रयत्न करून पहिल्या प्रयत्नात लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात आलेल्या मेडिकल ऑफिसर २०२३ मध्ये यश प्राप्त केले. डॉ. पूर्णचंद्र एमबीबीएस चे शिक्षण इंदिरा गांधी शासकीय वैद्याकिय महाविद्यालय (मेयो) येथे घेतले असून पदव्युत्तर शिक्षण शासकीय महाविद्यालय गोंदिया येथे आर्थोपैडिक विषयात केले आहे. पूर्णचंद्र ने आपल्या यशाचे श्रेय आपले वडील प्रा. सुरेश वंजारी, आई सौ. रोहिणी वंजारी तसेच पेस हॉस्पिटल भंडारा चे राजू व माया चकोले यांना दिले आहे.तसेच पूर्णचंद्र ने यशाबद्दल मिस्किन गार्डन चे योग गुरु शाम कुकडे, चींधूजी बुधे, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, माजी शिक्षणाधिकारी के झेड शेंडे, डॉ. केशव पाखमोडे, प्रकाश नंदू वंजारी, डॉ. रुपाली साखरवाडे, प्रा अशोक लांडगे, संजय मोहतूरे, प्रा जगन माकडे, चेतना वंजारी, मनोज गभने, सईद भाई शेख, महीला योग समिती सदस्या, मित्र परिवार ई. नी अभिनंदन केले आहे.