रस्ता बांधकामासाठी रस्ता रोको आंदोलन

 दै.लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- जिल्हा मुख्यालयाशी जोडणाऱ्या डोंगरदेव ते मांडवी रस्त्याची अवदशा झाली असल्याने दीड वर्षांपूर्वी ढिवरवाडा येथील माजी सरपंच धामदेव वनवे यांच्या नेतृत्वात रस्ता आंदोलन करण्यात होते. त्यावेळी दहा कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली. ५ ऑगस्ट २०२४ रोजी कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्यात आले. परंतु सध्या पावसाळा संपूनही कामाला सुरुवात होत नसल्याने धामदेव वनवे व ग्रामस्थांच्या वतीने १५ ऑक्टोबरला सकाळी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या अर्ध्या तासातच कंत्राटदाराने लेखी पत्र देत रस्त्याच्या बांधकामाला प्रारंभ केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. गत तीन वर्षापासून डोंगरदेव ते मांडवी रस्त्याचे बांधकाम रखडले आहेत. भंडारा व मोहाडी सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांमध्ये बोट दाखवित होते.

मोहाडी येथील राज्य सार्वजनिक बांधकाम उपविभाग सादर क्षेत्र मोहाडी तालुक्यात असला तरी रस्ता भंडारा उपविभाग कडे असल्याचे सांगत होते. त्यामुळे निधी आणायचा कसा, असा प्रश्न उपस्थित करायचे. दरम्यान तीन वर्षात तीनदा रस्त्याचे सालपटे निघाले. यंदाच्या पावसाळ्यात खोल खड्ड्यातून वाहतूक दारांना मार्ग शोधा लागला. वाहतुकदारांची समस्या लक्षात घेता तत्कालीन सरपंच धामदेव वनवे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रस्ता रोको केले होते. त्यावेळी आमदार राजू कारेमोरे यांच्या मध्यस्थीने १० कोटी रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला. पावसाळ्यापूर्वी बांधकाम होण्याचे आश्वासन देण्यात आले होते. कंत्राटदाराला ५ आगस्ट रोजी वर्क ऑर्डर देण्यात आले होते. परंतु पावसाळा संपुनही मंजूर निधीतुन बांधकाम होत नसल्याने नागरिक संतप्त होते.