शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही

 दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक २०२४ ची दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी घोषणा केली असून घोषणेच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी फफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये अधिकाराचा वापर करुन विविध बाबींवर निर्बंध आदेश निर्गमीत केले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही.

फिफरते वाहन रस्त्यावरुन धावत असताना त्यावर ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी ६ वाजेपूर्वी आणि रात्री. १० वाजेनंतर करता येणार नाही. हे आदेश जिल्ह्यासाठी २५ नोंव्हेंबर २०२४ रोजीपर्यत अंमलात राहील. निवडणूकीचे कालावधीत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी व महाराष्ट्र शासन गृह विभाग यांचे दिनांक २० सप्टेंबर २०१४ च्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यातील छाननी समितीने वगळलेल्या शस्त्र परवानाधारके व्यतिरिक्त इतरसर्व परवाना धारकास परवाना दिलेली शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास व शस्त्र बाळगण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश निर्गमित झाल्यापासून २५.११.२०२४ पर्यत अंमलात राहतील.