भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीवर जल पर्यटनाची सुरुवात

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्याचा अभिमान असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर, भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि त्यांच्याच पथक परिश्रमातून, भव्य जल पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देणारा आणि जिल्ह्यातील पर्यटनाच्या नकाशावर ठसा उमटवणारा हा महोत्सव रोजगारनिर्मितीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या शुभ हस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने, जिल्हा प्रमुख अनिलगायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धूर्वे, शहर प्रमुख मनोज साकोरे, महिला जिल्हा प्रमुख सविता तुरकर, नितीन धकाते, निलेश बंनपुरकर, कृष्णा ठवकर, शैलेश श्रीवास्तव, प्रकाश देशकर, नितेश मोगरे, किशोर नेवारे, सुधा बत्रा व अन्य पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीत वैनगनदीच्या काठावर, ऑफिसर्स क्लबच्या मागे, जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.