पद्माकर गिदमारे भंडारा कृषी उपविभागाचे नवीन उपविभागीय कृषी अधिकारी

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा कृषी उपविभागात चार तालुके भंडारा पवनी मोहाडी तुमसर येत असून उपविभागीय कृषी अधिकारी पद बरेच दिवसापासून रिक्त होते जिल्ह्यातीलच लाखनी येथील रहिवासी पद्माकरजी गिदमारे पदोन्नतीने पदस्थापना आदेश प्राप्त झाले. या अगोदर गीदमारे यांनी उपविभागीय कृषी अधिकारी साकोली व तालुका कृषी अधिकारी लाखनी तसेच तालुका कृषी अधिकारी भंडारा कृषी उपसंचालक भंडारा ईत्यादी महत्त्वाच्या पदावर त्यांनी आतापर्यंत उत्कृष्ट रित्या काम केलेले काम केलेले आहे. जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी यामध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे. उत्कृष्ट प्रशासक अभ्यासू हुशार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

शेतकऱ्यांविषयी त्यांना आपुलकीची तळमळ आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्याला नक्कीच त्यांचा चांगला फायदा होईल अशी अपेक्षा. जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी व शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यापूर्वी त्यांनी लाखनी व साकोली तालुक्यामध्ये ५ शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ मिळवून दिला. तसेच भाजीपाला फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढवण्याचे काम त्यांनी जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे केलेले आहे. रुजु होते वेळी पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन देण्यात आले तालुका कृषी अधिकारी भंडारा जीभकाटे सर, तालुका कृषी अधिकारी मोहाडी देशमुख मॅडम, गणेश शेंडे कृषी पर्यवेक्षक, गोपाल मेश्राम कृषी सहाय्यक, अजय खंडाळीत कृषी पर्यवेक्षक, मुकुंद खराबे कृषी अधिकारी भंडारा, अरुण रामटेके तंत्र अधिकारी, विराज देशमुख जिल्हा गुन नियंत्रण अधिकारी व इतर संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.