छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन सोहळा संपन्न

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- अखंड हिंदुस्थानाचे ऊर्जास्थान, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भंडारा शहरातील एकमेव अश्वरुढ पुतळा/स्मारक व परिसर दुर्लक्षित अवस्थेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे सौंदर्यीकरण करावे यासाठी आ. नरेंद्र भोंडेकर व तत्कालीन खा. सुनील मेंढे यांना छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान तर्फे मागील तीन वर्षांपासून दि. १६ सप्टें. ०२२ ला प्रथम व १८ डिसें. ०२२ ला स्मरण पत्र देऊन पाठपुरावा करण्याचे काम प्रतिष्ठान तर्फे वेळोवेळी करण्यात आले स्मारकाचे भव्यदिव्य पद्धतीने सौंदर्यीकरण व्हावे तसेच कामाला गती मिळावी यासाठी सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावित मुद्यांवर वेळोवेळी भेटी घेऊन चर्चा सुद्धा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किर्तीला शोभेल असे स्मारक तयार करण्यासाठी भव्यदिव्य प्रवेशद्वार उभारणी, सुरक्षा भिंतीची सुशोभीकरण/नवीनीकरण करणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे सुशोभिकरण करणे, स्मारक बाहेरील परिसरातील कचरा कुंडीचे नियोजन करणे, छत्रपती संभाजी महाराजांचे भिंती चित्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुटिंग व पेंटिंग करणे, स्मारक परिसरात गट्टू बसविणे, सुरक्षा भिंतीच्या बाजूने कॅरी करून वृक्ष व पौधे लावणे इत्यादी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. प्रथम निवेदन दिल्यापासून प्रतिष्ठानचे सदस्य सतत कामाचा पाठपुरावा करत आहेत.

दरम्यानच्या काळात आमदार प्रतिनिधी सुरेश धुर्वे व अभियंता यांना स्मारक परिसरात पाहणीसाठी बोलावून प्रस्तावित स्मारक सौंदर्यकरणाची रूपरेषा तयार करण्यात आली होती. अखेर प्रतिष्ठान च्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून स्मारक सौंदर्यकरणाच्या कामाकरिता आ. भोंडेकर यांच्या विकास निधीतून रु. ६० लक्ष तसेच तत्कालीन खा. मेंढे यांच्या विकास निधीतून रु. २० लक्ष असे एकूण रु. ८० लक्ष मंजूर झालेआहेत. त्यानिमित्ताने दि. १३ ऑक्टो. ०२४ रोजी आ. भोंडेकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यात सुरेश धुर्वे, संजय कुंभलकर, पुरुषोत्तम फुकटे, अविनाश जांगले, अंकुश कळंबे, भरत मल्होत्रा, कृष्णा ठोसरे, कमल साठवणे, केदार बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन झाल्यानंतर आमदार भोंडेकर यांचा सत्कार प्रतिष्ठान तर्फे करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे दुर्गेश गभने, निखिल कुंभलकर, आशिष भोंगाडे, मयुर गभने, कार्तिक ठोसरे, आकाश बावनकुळे, निलेश भोंगाडे, निहाल साकोरे, अतुल साठवणे, रुपेश बावनकुळे, राजेश गभने, वैभव ठोसरे, कृतज्ञा कुंभलकर, समर्थ कुंभलकर, हिमांशू फुकटे, केयुर बांते, फुकटे काकू, रघुते काकू व इतर सदस्य उपस्थित होते.