हरियाणात जाटमुळे ओबीसी एकटवला, प्रश्नावर जरांगे भडकले; विधानसभेसाठी भाजपला इशारा

जालना:- देशातील दोन राज्यात झालेल्या निवडणुकांच्या निकालात भाजपला चांगलं यश मिळालं असून हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सत्ता काबिज करण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे, भाजप नेत्यांचा विश्वास वाढला असून हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही महायुती व भाजपला मोठं यश मिळेल, असं भाजप नेते सांगत आहेत. त्यातच, हरियाणामध्ये जाट समाजाविरुद्ध ओबीसी मतदान एकटवल्यामुळे भाजपचा तिथं विजय झाल्याचं मत नोंदविण्यात येत असल्यासंदर्भांत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, कधी हिंदुत्व म्हणतात, कधी ओबीसी म्हणतात यांचे यांनाच कळत नाही. हरियाणा आणि महाराष्ट्रात तिकडे आणि इकडे फरक आहे, हरियाणात एखादा मराठा, एखादा जाट किंवा एखाद्या शेतकऱ्याने मतदान केलंच असेल ना, मतदान होऊन गेलं की हे असं बोलतात. हे उपकार फेडणारे लोकं आहेत, होऊ गेलं की दुसऱ्याचं नाव घेतात, असे म्हणत मनोज जरांगे यांनी हरियाणा व महाराष्ट्रातील राजकारण वेगळं असल्याचं म्हटलं. महाराष्ट्रातून आम्ही पणभाजपला १०६ आमदार दिले होते, इकडचा प्रश्न वेगळा तिकडचा प्रश्न वेगळा आहे, इथे एकटा मराठा ५० ते ५५ टक्के आहे. इथे एका मतदार संघात लाख-लाख मतदान आहे, असे म्हणत हरियाणातील निकालावर भाजपने जाऊ नये, असा इशाराच मनोजजरांगे पाटील यांनी भाजपला दिला आहे. निवडून येताना आणणारा एक आणि नाव एकाचं घ्यायचं ही यांची सिस्टमच आहे, उपकाराची परतफेड करायची, हे एकदम खालच्या थराला जात आहेत. जो मोठे करतो त्यांच्याच नावाने हे खडे फोडतातय. यांना हिंदुत्वाने निवडून आणलं की ओबीसींनी निवडून आणलं की यांना बहुजनांनी निवडून आणलं काही ताळमेळ नाही. ज्यांनी निवडून आणलं, त्यांच्याविरुद्धच नाव हे सांगत आहेत