आज खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते भिलेवाडा येथे मशीन स्थापना दिवस

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भिलेवाडा येथील व्हिडीओकॉन कंपनीत विंडवेल इलेक्ट्रॉनिक प्रा. लि. द्वारा हुंडई इलेक्ट्रॉनिक प्रा. लि. सोबत रेफ्रिजेटर व एलईडी टिव्ही बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येत आहे. यासाठी उद्या दि. ९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजता खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते मशीन स्थापना दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहीत कंपनीचे प्रमुख बाळकृष्ण आर्य यांनी दिली आहे. भिलेवाडा येथे व्हिडीओकॉन कंपनी पार्ट बनविण्याचा उद्योग सुुरु करणार होती. दहा वर्षापूर्वी या कंपनीचे उद्धाटन झाले होते. यातून हजारो बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार होते. मात्र ही कंपनी सुरु होवू शकली नाही. व बेरोजगारांचे स्वप्न अंधारात मिसळले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. प्रफुल पटेल यांनी ही कंपनी सुरु करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले. आता ही कंपनी विंडवेल इलेक्ट्रॉनिक प्रा. लि. द्वारा हुंडई द्वारा रेफ्रिजेटर व एलईडी टिव्ही बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येणार आहे. यासाठी मशिनरी बोलाविण्यात आल्या असून मशिनरीची स्थापना उद्या खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते होणार आहे. आता ही कंपनी सुरु होणार असल्याने यातून बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळणार आहे.