भंडारा जिल्ह्याच्या लेकीला शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मान

दै.लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व शालेय शिक्षण विभागाने २०२२-२३ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा केली असून, महिला गटात भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द गावातील शुशिकला दुर्गाप्रसाद आगाशे हिला हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. शुशिकला ही लहान गावातील एक साधी मुलगी असली, तरी तिच्या कठोर परिश्रम आणि क्रीडाक्षेत्रातील अद्वितीय कामगिरीमुळे ती आज महाराष्ट्राचा गौरव बनली आहे. नॅशनल ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून तिने आपले नाव देशभर गाजवले. तिच्या या यशामुळे शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित होणे हे तिच्यासाठी आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी