काँग्रेसला पुन्हा डॉक्टर उमेदवारच ठरणार “तारणहार’

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्यात तब्बल २५ वर्षानंतर खाता उघडला असून जनतेनी उच्चशिक्षित डॉक्टरवर प्रथम पसंती लोकसभेत दाखवली आहे. तोच जनतेचा कल काँग्रेसकडे कमी तर संतापित व त्रस्त जनतेनी नव्या उत्साही डॉक्टरकडे पाहून आपला लोकप्रतिनिधी निवडला होता. काँग्रेसी बॅनर मधून भंडारा जिल्ह्यात डॉक्टर उमेदवारला संधी देऊन आपले भाग्य आजमावले होते. लोकसभेत उच्चशिक्षित डॉक्टर जे सदैव रुग्णसेवेत समर्पित आहेत त्यांना जनसेवा शिकण्याची गरज नव्हती. लोकसभेत अनेक घराणेशाही व परंपराची दुकाने लावून बसणारे उमेदवार जनतेनी पराभूत केले व निरंतर रुग्णसेवेत समर्पित डॉक्टरला संधी दिली. हे लोकसभेत ज्वलंत उदाहरण खरे ठरल्याने आगामी विधानसभेत काँग्रेसला डॉक्टर मंडळीच नशीबवान ठरणार असे संकेत दिसत आहे. भंंडारा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसच्यावतीने उच्च शिक्षित असलेले डॉ. अतुल टेंभुर्णे हे उमेदवारीसाठी ईच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास दुसरा डॉक्टर काँग्रेससाठी “तारणहार’ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भंडाराच्या नशिबात व अनेक आजाराने ग्रासलेल्या या गंभीर वातावरणात डॉक्टर अतुल टेंभुर्णे हे योग्य उपचार करु शकणार असल्याची जोरात चर्चा सुरु आहे. भंडारा शहरापासून तर पवनी ग्रामीण पर्यंत टेंभुर्णे यांना सर्व स्तरावरुन जनतेने प्रथम पसंती दिली आहे. मनमिळावू, मृदभाषी, सामान्य जनतेत मिसळणारे व सदैव रुग्ण सेवेत दिवसरात्र सेवा देणारे डॉ. टेंभुर्णे यांना काँग्रेस संधी देऊन या क्षेत्रावर कब्जा करु शकते. त्यांच्या व्यक्तीमत्वाला रुग्णसेवाचे वरदान लाभले असल्याने जनसेवा व क्षेत्राच्या कायापालटसाठी एक तगडा, उच्चशिक्षित उमेदवार काँग्रेसचे भाग्य चमकवू शकते. या क्षेत्रात शहरी व ग्रामीण भागात आगामी निवडणूकीत कोणताच पॅटर्न चालणार नसल्याने जनता जागृत झाली आहे. डॉक्टर व रुग्णसेवेत कसलीही जातपात नसल्याने फक्त रुग्णाचा उपचार व बरा कसा होईल हा उद्देश सामोर असतो. काँग्रेसने डॉ. पडोळे वरुन भाग्य चमकल्याने डॉक्टर टेंभुर्णेकडे देखील भंडारा विधानसभेसाठी अपेक्षा वाढल्या दिसत आहेत.

डॉक्टरकडे येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक व काँग्रेस कार्यकर्ते डॉ. टेंभुर्णे यांनी भंडारा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी साकडे घालतांना दिसत आहे. मागील अनेक वर्षांपासून या क्षेत्राच्या गंभीर रोगाला व अनेक समस्यांना डॉक्टर टेंभुर्णे हे एकमात्र रामबाण उपाय असल्याचे बोलल्या जात आहे. या निवडणूकीत घराणेशाही, परंपरा व स्वयंविकासचा रेकार्ड तुटणार असून हजारो मतदार एका उच्चशिक्षित डॉक्टर अतुल टेंभुर्णे यांना संधी देण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत क्षेत्रातील जनतेत अपरिचित असलेले वकील स्व. रामचंद्र अवसरे यांचे भाजपाने अचानक पदार्पण करुन भंडारा विधानसभा जिंकली होती. त्यानंतर नुकताच चार महिण्याआधी काँग्रेसने पण पदार्पण करण्यासाठी लोकसभा निवडणूकीत दोन जिल्ह्यात अपरिचित असलेले परंतु उच्चशिक्षित डॉक्टर व उत्साही उमेदवाराला जनतेने पोटाशी घेतले. या दोन उदाहरणावरुन भंडारा विधानसभेसाठी आगामी निवडणूकीत “मीच आमदार’या प्रणालीला गतिरोधक लागणार असून जनतेत उत्साही व उच्चशिक्षितांची नक्कीच वर्णी लागू शकते. अशा उमेदवारांना कोणत्याही पक्षांनी जवळ घेतले जरी व्यर्थ जाणार नाही, अशी चर्चा आहे.