एक हजाराच्यावर युवकांचा शिवसेनेत प्रवेश आ. नरेंद्र भोंडेकर यांचे नेतृत्व स्विकारले

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा विधानसभेतिल एक हजारांच्या वर युवकांनी आज आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश घेतला. आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते येथील मंगलमूर्ती मंगल कार्यालयात या कार्यकर्त्यांना भगवा दुपट्टा घालून प्रवेश देण्यात आले. येथी मंगल मूर्ती मंगल कार्यालयात आयोजिय या भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले संजय कुंभलकर यांनी केले होते. आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे गेल्या अडीच वर्षातच भंडारा पवनी विधानसभेच्या प्रत्येक क्षेत्रात विकास कार्य करीत विधानसभेचा चेहरा मोहरच बदलण्यात आला आहे. या विकास कामांना बघता लोकांचे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ही वाढत जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश घेणारे संजय कुंभलकर यांनी आज भव्य प्रवेश सोहळा आयोजित करून एक हजार पेक्षा अधिक युवकांना शिव सेना (शिंदे गटात) प्रवेश करवीला. त्यांच्यासह डॉ.अनिल कुर्वे, प्रा. श्रीकांत मानकर यांनी सुद्धा यावेळी पक्षात प्रवेश केला.

यावेळी बोलतांना आम. नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, भंडारा विधानसभेचा विकास आणि भंडाऱ्याला जगाच्या पाठीवर ओळख मिळवून देणे आणि त्या माध्यमातून भंडारा पवनी येथील युवकांना रोजगार मुळवून देणे हा त्यांचा ध्येय राहीला आहे आणि तो लवकरच पूर्ण होतांना सुद्धा दिसत आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येत झालेल्या युवकांच्या पक्ष प्रवेश मुळे असे वाटायला लागले आहे की माझे “आपला भंडारा विकसित भंडारा’ हा ध्येय पूर्ण व्हायला उशीर लागणार नाही. या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धूर्वे, लोकसभा समन्वयक संजय कुंभलकर, युवासेना जिल्हा प्रमुख नितीन सेलोकर, शहरप्रमुख मनोज सकोरे, तालुका प्रमुख नरेश झळके, युवासेना तालुका प्रमुख हरीश देशमुख, अनुसूचित जाती आघाडी जिल्हा प्रमुख, संजय नागदेवे, युवासेना उपजिल्हा प्रमुख कृष्णा ठवकर, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख मयूर लांजेवार, शहर संघटक नितीन धकाते, युवासेना शहर प्रमुख किशोर नेवारे, सरपंच आशू वंजारी यावेळी उपस्थित होते.