मजूर नेणाऱ्या मेट्याडोरला टिप्परचा धका; १ ठार तर २४ जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- सोयाबीनच्या हंगामासाठी नागभीडकडून भुयारकडे येणाऱ्या मेट्याडोरला मागेहुन टिप्परची जोरदार धक्का लागल्याने उपचारा दरम्यान एका महिलेचा मृत्यू तर २४ मजूर जखमी झाल्याची घटना भुयारकानपा बॉर्डरलगत मंगळवारी सकाळी १० वाजेदरम्यान घडली. यातील मृतक महिलेचे नाव गायत्री रोशन हेमने (३६) डोंगरगाव ता. नागभीड असे आहे. सदर घटनेने सर्वत्र हळहळ पसरली आहे. सध्या सोयाबीन पीक कापनीचा हंगाम सुरू आहे. यासाठी सदर मजूर भुयार मार्गे धुरखेडा तालुका उमरेड येथे जात होते. दरम्यान मेट्याडोर मध्ये मजुरांना नेत असतांना भंडारा जिल्हा बॉर्डरजवळ चंद्रपूर जिल्हा हद्दीत ओव्हरटॅक करतांना धक्का दिल्याने मेट्याडोर पलटला. पलटलेल्या मेट्याडोरचा नंबर एमएच ३४ बीजी १७२० असा आहे. सदरची माहिती नागभीड पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून पुढील कारवाई केली. जखमींना जवळच्या भुयार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

येथून पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारा दरम्यान एक महिला मजूराचा मृत्यू झाला. परिस्थिती गंभीर असल्याने उर्वरित ७ मजुरांना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले आहे. काहींना नागपूर येथेही पाठविल्याचेकळते. यातील जखमींची नावे सुष्मा योगेश हजारे रा.कसरला, शशिकला धनराज धनविजय रा कसरला, शकुंतला ढोक नागभीड, जयश्री श्रीरामे नागभीड, मंगला बागडे डोंगरगाव, मुक्ताबाई नारनवरे डोंगरगाव, मंगला बागडे डोंगरगाव, गोपाल नशीने पेंढरी, ज्योती गोपाल नशीने पेंढरी, रुमावती सुधाकर गजभे पेंढरी, संगीता पुरुषोत्तम श्रीरामे पेंढरी, राजू नखटू कांबडी पेंढरी, विलास दादाजी मंडपे पेंढरी, विनोद मधुकर मंडपे पेंढरी, कांता गोमा माटे पेंढरी, ममता अरुण शेरकुरे पेंढरी, मीरा श्रीराम पाखोडे डोंगरगाव, मनीषा सूभाष नन्नावरे कसरला, तनुजा शिवदास बहेमते डोंगरगाव, कांता मेश्राम पेंढरी, दुर्गा शेरकुरे पेंढरी, सुमित्रा उईके डोंगरगाव, कुसुम बोरकर डोंगरगाव, राखी सुखदेवे कसरला, संगीता श्रीरामे पेंढरी अशी आहेत. घटनेचा तपस नागभीड व पवनी पोलीस करीत आहेत.