वारंवार विद्युत पुरवठा खंडित करणे थांबवा, अन्यथा कार्यालयाला कुलूप ठोकू

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- मागील काही दिवसापासून साकोली व शेंदुर्वाफा नगरपरिषद क्षेत्रात अघोषित लोड शेडिंग म्हणजेच वारंवार विद्युत पुरवठा हेतू पुरस्कार खंडित करून स्थानिक नागरिकांना महावितरणने वेठीस धरून ठेवले त्यामुळे कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी यांना दिलेल्या निवेदनात माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज यांनी आठ दिवसाच्या अल्टिमेटम दिला असून संबंधित अधिकाऱ्यांनी वारंवार विद्युत पुरवठा खंडित केल्यास कार्यालयाला कुलूप ठोकू असे दिलेल्या निवेदनात माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज यांनी म्हटले आहे साकोली, शेंदुर्वाफा नगरपरिषद हद्दीमध्ये असलेले घरगुती व्यावसायिक वीज ग्राहकांना स्थानिक वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या लाल फीतशाहीमुळे वारंवार खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. साठवली नगरपरिषद क्षेत्रात केव्हा लाईट जाईल याची कोणतीही शाश्वती नसते आणि लाईट केव्हा येईल याबाबत ही वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याकडून सांगितले जात नाही. त्यामुळे अचानक वीज येते व अशा वेळेस वीज पुरवठा उच्च दाबाचा असला की घरात ठेवलेले साहित्य जसे टीव्ही फ्री कुलर पंखे झेरॉक्स मशीन बोरवेल मोटर कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तू या अतिउच्च दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे किंवा खराब होतील याचीही गॅरंटी नसते.

मागील दोन ते तीन महिन्याच्या काळात पावसाळ्याच्या वेळेस वीज वितरण कंपनीच्या लापरवामुळे अनेक ग्राहक व व्यावसायिक लोकांचे इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल उपकरणांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आहे. वीज वितरण कंपनीने आपली चूक मानून नुकसान झालेल्या ग्राहकांची नुकसान भरपाई करून देण्याची मागणी सुद्धा या निवेदनात माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज यांनी केली आहे. नगरपरिषद हद्दीमध्ये वीज वितरण कंपनीने पुरवठा खंडित करतांनी नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक कारण असेल अशाच परिस्थितीमध्ये वीज पुरवठा खंडित करण्याच्या कायदा असतानी सुद्धा परिसरात कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अवकाळी विज किंवा अवकाळी पाऊस नसताना सुद्धा फक्त नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने वीज वितरण कंपनीकडून पुरवठा खंडित केला जातो. तसेच एखाद्या ग्राहकाने वीज बिल भरला नाही तर संबंधित कर्मचाऱ्याकडून तात्काळ त्या ग्राहकाची लाईट कापली जाते.

परंतु जर वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वीज पुरवठा खंडित करून संबंधित ग्राहकांचे उपकरण खराब होत असतील तर अशा परिस्थितीमध्ये वीजवितरण कंपनीने स्थानिक नागरिकांना मोबदला द्यावा. कारण याबाबत सुद्धा कायदा असून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडून हे परिपत्रक स्थानिक नागरिकापर्यंत पोहोचू देत नाही. त्यामुळे जनतेला किंवा ग्राहकांना आपले अधिकार काय आहेत, याची जाणीव नसते. त्यामुळे माजी नगरसेवक हेमंत भारद्वाज यांनी दिलेल्या निवेदनात वीज पुरवठा खंडित करणे म्हणजे वीज वितरण कंपनीचे अधिकारी हिटलर शहाप्रमाणे वागत असून स्थानिक नागरिक व ग्राहकांना मूर्ख बनविण्याचे काम वीज वितरण कंपनी मार्फत सुरू आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना आज हेमंत भारद्वाज यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. निवेदन देतानी बंटी सोनकुसरे, अखिल गुप्ता, सुनील जगीया, अनिल चूघ, सतीश नंदेश्वर, नरेश करंजेकर तथा परिसरातील नागरिक उपस्थित होते.