सहयोग सहकारी पत संस्थेची ३५ वी वार्षिक आमसभा साजरी

दै.लोकजन वृत्तसेवा तुमसर :- भंडारा जिल्हा व नागपुर विभागातील अग्रगण्य पत संस्था “सहयोग सहकारी पत संस्था मर्या. तुमसर” ची ३५ वी आमसभा दि. २९ सप्टेंबर २०२४ ला स्थानिय पुज्य सिंधी धर्मशाला तुमसर येथे संस्थेचे अध्यक्ष मो. तारिकजी कुरैशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. दिप प्रज्वलीत करून सभेची सुरूवात करण्यात आली, संस्थेचे दिवंगत सभासदांना श्रध्दांजली अर्पित करण्यांत आली. संस्थेचे सन २०२३-२०२४ या आर्थीक वर्षाचे अहवाल संस्थेचे संचालक रमेशजी निखाडे यांनी सादर केले व त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मो. तारीकजी कुरैशी यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात संस्थेच्या ३५ वर्षाच्या प्रगतीवर विस्तृत माहीती तसेच संस्थेव्दारे जेष्ठ नागरीक व महिला करीता मातृपितृ मुदत ठेव योजना सुरू केली आहे.

या मध्ये जेष्ठ नागरीकांना १ टक्के व महिनाकरीता ०.५ टक्के जास्त व्याज दर दिले जाईल असे सांगीतले. या आर्थिक वर्षात संस्थेने रू. ५७.०९ लाख चे शुध्द नफा अर्जित केला असुन संस्थेचे अध्यक्ष मो. तारिक कुरैशी यांनी सभासदांना ६ टक्के प्रमाणे लाभांष देण्याची घोषणा केली. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीत (डिपॉझिट) ७.१० टक्के वाढ होऊन रू. ७२.५३ कोटी झाली आहे तसेच भागभांडवल (शेअर्स) मध्ये ८.३७ टक्के वाढ होऊन रू. ३.८८ कोटी झाली आहे संस्थेने आर्थीक वर्षात रू. ५६.७८ कोटी चे कर्ज वितरण केले आहे.

संस्थेचे ज्येष्ठ सदस्य सुभाष मार्जिवे, तिमा सिंदपुरे, पुरणलाल टेंभरे, अरुण लांजेवार, लालाभोयर, बाबूजी ठवकर, नारायण बडवाईक, रामुजी सेलोकर, श्रीमती भगवती पशिने, सौ. सिंधु बडवाईक, सौ. विमल खोब्रागडे, कु. सरोज लांजेवार आणि उत्कृष्ट कर्जदार शांतराम कटरे, शिवनंदन गोखले, राजुजी सानेकर, उत्कृष्ट ठेविदार संजय चकोले, सहसराम बिसेन यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेतर्फे सन २०२३-२४ मध्ये प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्याथ्यार्ंना प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सभेचे संचालन संस्थेचे संचालक डॉ. युवराज जमईवार यांनी केले व आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक प्रभाकर सिंगनजुडे यांनी व्यक्त केले. सभेत मधुकर कुकडे सभासद व माजी खासदार, ललित थानथराटे जेष्ठ सभासद, संस्थेचे संचालक दामोधर सोनवाने,विजय अनवानी, डॉ. अनुप कोरडे, चंद्रकुमार फुलवाधवा, राशिद शेख, ॲड. विजय पारधी, सौ. मालती आगाशे, सभासद दिनेश अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद धांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मो. सोहेल कुरैशी उपस्थित होते. सभेला यशस्वी करण्याकरीता संस्थेचे कर्मचारी समिर पवार, प्रमोद ठाकरे, अजय पालवे, महेन्द्र कोंडेवार, अमित ईलमे, सौ. कुसुम गभने, लक्ष्मीकांत पारसे, नितिन चावके, प्रकाश कोवे, योगेश मस्के, भास्कर ढबाले, भुमेश्वर कोसरे, जितेश सोनकुसरे, विरेन्द्र दमाहे, अविनाश मोटघरे, श्रीराम गभणे, सौ. धनश्री जोशी, श्रीमती अश्विनी समर्थ, सौ. विणा बारेवार, सौ. धनश्री येरणे, सौ. सुनिता बिसने, मोरेश्वर मस्के, विनायक सहारे, सुरेश क्षिरसागर सर्व कर्मचारी व शाहिद कुरैशी अभिकर्ता यांनी प्रयत्न केले.