शहरातील खड्डयाविरोधात शिवसेना चा “रास्ता रोको ‘ आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शहरातील व शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पडलेल्या खड्डयासंदर्भात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, न. प. कार्यालय, सा. बा. वि., राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला अनेकदा निवेदने दिलेले होते. परंतु ढिम्म प्रशासनाच्या उदासिनतेमुळे निवेदनावर कार्यवाही न केल्यामुळे शहरातील व शहरात कामानिमित्त येणाऱ्या हजारो नागरिकांना रोजच ह्या खड्ड्यांमुळे प्रचंड मनस्ताप होतो, या खड्ड्यामुळे अनेक लहान मोठ्या अपघातातून अनेकांना जीवाशी मुकावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्व आले. वाहनधारक आपल्या वाहनाच्या माध्यमातून दरवर्षी शासनाला टॅक्स देतो.त्यामोबदल्यात त्याला चांगले रस्ते उपलब्ध करून हे संबंधित विभागाचे काम आहे. न. प. प्रशासन सुध्दा शहरातील जनतेकडून टॅक्स जमा करते परंतु ना शुध्द पाणी, ना चांगले रस्ते, ना बगिचे परंतु अशा कामांवर मात्र प्रचंड भ्रष्टाचार करून जनप्रतिनिधी व अधिकारी करोडो ची माया जमा करित आहेत. ह्याशिवाय शहरातील सुरू असलेल्या अनेक विकास कामांमध्ये कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असतांना न. प. चे अधिकारी मात्र फक्त कार्यवाही करू च्या नावावर दिशाभूल करीत असल्यामुळे भंडारा शहर शिवसेनातर्फे राजीव गांधी चौक येथे ” रास्ता रोको ‘ आंदोलनाचे आयोजन आज राजीव गांधी चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख संजयभाऊ रेहपाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

यावेळी शहर प्रमुख आशीक चुटे, नरेंद्रपहाडे, राकेश आग्रे, मनीष सोनकुसरे, तिलक सार्वे, विनोद डाहारे, हर्षल टेंभुरकर, चित्रागंध सेलोकर, संदिप गभने, गंगाधर निंबार्ते, नितीन कळंबे, अश्विन खरोले, जयेश रामटेके, गुरूदेव साकुरे, गोपीचंद गोमासे, सुरज मालाकार, शुभम बहादुरे, अरविंद भुरे, अमित चकोले, शेखर वाघमारे, नितीन भुरे, सुनील नागपुरे, रोशन मेश्राम, प्रकाश गभने, संजय समरीत, कोमल जावळकर, इम्रान शेख, बाळु परतेती, निखील साकुरे, दत्ता लोहकरे इ. शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते. राजीव गांधी चौकात रस्ता रोको सुरू असतांना पोलीस प्रशासनाने जिल्हाप्रमुख संजयभाऊ रेहपाडे व इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात रवानगी केली.