देव्हाडा खु. येथील श्रम दानाच्या माध्यमातून झालेल्या सिमेंट रस्ता कामाचे लोकार्पण

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः- मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्ते कडून गावाच्या हीतासाठी श्रमदान व आर्थिक मदत चे सहकार्य करून १०/ ४ मिटर सिर्मेंट रस्ता बनवून गावाच्या हीतासाठी एक नविन उपक्रम राबविले आहे, आणि दि. १८ जून २०२४ मंगळवार ला सिर्मेंट रस्त्याचे लोकार्पण सोहळा जि. प. सदस्य महादेव पचघरे, पं. स. सदस्य वंदना सोयाम, सरपंच उषा कांबळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी निलज येथील सरपंच लिलाधर कांबळे, उपसरपंच चंद्रकांत पुंडे, ग्रा. पं. सदस्य हरेद्र डोंगरे, वैभव बुधे, कार्तीक शहारे, मिराबाई वैद्य, जयतुरा देवगडे, दुर्गा मडावी, सारंगा ढेंगे, सुशिला उईके, प्रेमलाल कांबळे, विशाल ढेंगे, संतोष मेश्राम, नागेश्वर राऊत, प्रतिक वैद्य, मुक्तानंद कांबळे, घनश्याम ईश्वरकर, सोपान ढेंगे, रतन पंचबुधे, स्वप्नील क्षीरसागर, प्राजंल बुधे, रमेश मेश्राम व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्तेची उपस्थिती होती.