पोलीस भरतीच्या २ लाख उमेदवारांची व्यथा, मनोज जरागेंना मंत्र्यांचा फोन; शंभूराज देसाईंकडून आश्वासन

मुंबई:- राज्यात उद्यापासून १७ हजार ४७१ जागांसाठी पोलिस भरती सुरू होत असून यासाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आलेले आहेत. विशेष म्हणजे अनेक उच्चशिक्षित उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. अगदी डॉक्टर, व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी (एमबीए) अभियांत्रिकी पदवी (बीटेक), विधि पदवी (एलएलबी) झालेले उमेदवारही स्पर्धेत आहेत. मात्र, ही भरतीप्रक्रिया जनी २०२२-२३ ची असून दीड ते २ वर्षे उशिराने जाहिरात निघाली आहे. त्यामुळे, सुमारे २ ते ३ लाख उमेदवार एजबार झाले आहेत. त्यामुळे, त्यांना या भरतीप्रक्रियेत अर्ज करता येत नाही. त्याच, अनुषंगाने या उमेदवारांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, उत्पादन शुल्क मंत्री शुभराजे देसाई यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. त्यावर, मंत्री महोदयांकडून आश्वासन देण्यात आलं आहे. पोलीस भरतीमधील वयवाढीबाबत मराठा तरुणांनी मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरुन मंत्री शंभूराज देसाईंची भेट घेतली. त्यावेळी, विद्यमान पोलीस भरती २०२२-२३ ची भरती आता काढलेली आहे. त्यामुळे, अनेक मुलांची वयोमर्यांदा ओलांडल्याने अनेक उमेदवारांचं नुकसान होतं असल्याची व्यथा मुलांनी शंभूराज देसाई यांच्याकडे मांडली. आम्हाला फक्त आश्वासन दिलं जात आहे, पण भरतीप्रकिया सुरू होत असल्याने उमेदवारांनी नाराजी दर्शवली आहे. आम्ही २०२२२३ च्या भरती प्रक्रियेनुसार वयोमर्यांदेत बसतो. सुमारेदोन ते अडीच लाख विद्यार्थीं वयोमर्यांदेमुळे बाद ठरत आहेत.त्यामुळे, आम्हाला भरती प्रक्रियेत समाविष्ठ करुन घेण्याची मागणी या उमेदवारांनी केली आहे.