नाना पटोलेंना चिखल लावून निषेध नोंदवणार; भाजप नेत्याचा थेट इशारा, म्हणाले…

अमरावती:- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून हाताने स्वत:चे पाय धुवून घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फफुटले आहे. या कृतीमुळे महायुतीमधील नेत्यांनी नाना पटोलेंवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच भाजपमधील एका नेत्याने नाना पटोलेंच्या या कृतीचा निषेध नोंदवत थेट इशारा दिला आहे. नाना पटोले जिथे जिथे जातील तिथे त्यांना चिखलात लोळवण जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे कुठे कुठे धुवून घेतील हे त्यांना माहिती पडेल. काँग्रेसवाल्यांची ही मस्ती आहे. यात त्यांना थोडसं जरी यश मिळालं तर त्यांच्या डोक्यामध्ये सम्राटपणा जातो, सरंजामी जाते. सामान्य माणसांवर अन्याय करणे सुरू करतात. गुलामी सुरू करतात. त्यामुळे या गोष्टीचा सर्वांनी निषेध करावा, असे आवाहन भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलय. तसेच भाजप नाना पटोले यांना चिखल लावून या घटनेचा निषेध नोंदवणार, असा इशाराही त्यांनी दिलाय.