१९ जून पासून गोंदिया मुख्यालयात पोलीस शिपाई पदभरती

गोंदिया:- गोंदिया पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३ (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया २०२४) ११० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सदर भरती करिता मैदानी (शारिरीक) चाचणीची दिनांक १९ जून ते ४ जुलै २०२४ या कालावधीत राहणार असल्याची माहिती गोंदियाचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी गोंदिया शहर पोलिस स्टेशन येथे सोमवार १७ जून रोजी आयोजित पत्रपरिषदेत दिली.ही भरती कारंजा येथील पोलीस मुख्यालयातील पटांगणावर आयोजित करण्यात आलेली आहे.पत्रपरिषदेला अतिरिक्त पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षकसुर्यवंशी उपस्थित होते.