ढिवरवाडा रेती घाटावर दोन महिन्यात चौथ्यांदा कारवाई

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मोहाडी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या ढिवरवाडा नदी घाटावर रेती चोरी प्रकरणी दोन महिन्यात चौथ्यांदा कारवाई करण्यात आली. ढिवरवाडा येथील वैनगंगा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात रेती डम्पिंर्ग करून ठेवण्यात आली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मोहाडीचे तहसीलदार सुरेश वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी संगीता हलमारे, तलाठी एच. एन. कटरे, कोतवाल अनिल वैद्य, चालक क्रिष्णा भोयर यांच्या चमूने धाड टाकली. त्यावेळी त्यांना घाटावर ७८ ब्रास रेतीचा साठा आढळून आला. हा रेतीचा साठा जप्त करून कान्हळगाव रेती डेपोमध्ये जमा करण्यातआला. यावेळी सरपंच सौ. प्रिती ठवकर, उपसरपंच शरद रोटके, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.