मुलानेच केला हाथोडयाने वार करून वडीलांचा खून

गोंदियाः- गोंदिया शहराजवळील ग्राम अदासी तांडा येथे एका मुलानेच आपले वडील आपल्याला दारू पिण्यास मनाई करत असल्याने याचा राग मनात आणून त्यांच्या आटोरिपेरिंर्गच्या दुकानात आपल्या वडीलांवर दुकानातील हाथोडयाने वार करून त्यांचा खून केल्याचे घटना ५ जूनला रात्रीच्या सुमारास घडली. यानंतर या खूनाचा बनाव रचण्याचा मुलाने प्रयत्न केला. व आपले वडील कुलरच्या सामान आणायला गोंदियाला गेले कधी असे तर आईने विचारले असता दुकानाच्या सामानाकरिता देवरीला गेले असा बनाव करून कुटंुबियांची व जवळील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता. पण पोलिस तपासात अखेर यांचे बिंग फुटले असता गोंदिया ग्रामीण पोलिसांनी मुलाचा अटक केली आहे. सविस्तर प्रकरण असे की, गोंदिया जवळील ग्राम तांडा अदासी येथे आटो रिपेरिंर्गची दुकान चालविणारे दोन बाप लेक होते.

यातील मुलाला दारू पिण्याचे अत्यधिक व्यसन असल्यामुळे त्याच्या वडीलांनी त्याला प्रयास व्यसन मुक्ती केंद्र वर्धा येथे तीन महिण्याकरिता दाखल केले होते. व कालावधी पूर्ण झाल्यानंतर आता आपला मुलगा व्यसन मुक्त झाला असेल या अपेक्षेने त्याला घरी घेवून आले. व दोन्ही बापलेक आपल्या आटोरिपेरिंग व पार्टच्या दुकानात नित्यनेमाने जावू लागले अश्यात ४ जूनच्या रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या मुलगा राकेश रामलाल कांबळे वय २५ वर्ष रा. तांडा ता. गोंदिया याने आपले वडील रामलाल राजाराम कांबळे वय ४८ रा. तांडा ता. गोंदिया जे त्याला दारू पिण्यापासून आळा घालत होते. त्यांचा आपल्या आटोरिपेरिंर्गच्या दुकानातच हाथोडयाने वार करून खून करून दिला. या बाबतची माहिती त्यांच्या दुकानात दररोज येवून बसणारे गावातील माजी सरपंच अशोकसिंह प्रतापसिंह गौतम वय ५८ यांना मिळताच त्यांनी दुकानात इतर सोबतीं सह जावून पाहिले असता रामलालहा रक्ताच्या थारोळयात पडून होता.याबाबतची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याला देण्यात आली.या प्रकरणातील आरोपी मुलगा राकेश रामलाल कांबळे वय २५ वर्ष याला अटक करण्यात आलेली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास गोंदिया ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक सुधीर शिवनाथ वर्मा यांच्या मार्गदर्शनात श्वान पथकचे विक्रमसिंग सादतकर, रविंद्र शिवणकर, चालक येरणे करीत आहेत. एकंदरित एका मुलाने आपल्या वडीलांना फक्त दारू पिण्यास आळा घालत असल्यामुळे त्यंाना खून करणे म्हणजे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.