काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांचा विजय

 दै.लोकजन वृत्तसेवा दै.लोकजन वृत्तसेवा दै.लोकजन वृत्तसेवा दै.लोकजन वृत्तसेवा दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा ः – ११ भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघाची निवडणूक १९ एप्रिल रोजी झाल्यानंतर १८ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले होते. आज दि. ४ जून रोजी मतमोजणी सुरु झाली. सुरुवातीपासून सुनील मेंढे व डॉ. प्रशांत पडोळे यांच्यात अटीतटीचा सामना चालला. प्रत्येक फेरीत दोघांचीही आघाडी मागेपुढे राहत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र २१ व्या फेरीनंतर डॉ. प्रशांत पडोळे यांचा लिड वाढत गेला.अधिकृत निकाल जाहिर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या कार्येकर्त्यांनी गणित काढून डॉ. प्रशांत पडोळे हे २९ हजार १६३ मतांनी निवडून आल्याचा संदेश पाठविला. व लगेच डॉ. प्रशांत पडोळे यांचा विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली.

सुनील मेंढे यांच्या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते प्रफुल पटेल यांचा पाठिंबा व्यर्थ ठरल्याचे दिसून आले. बसपाचे उमेदवार संजय कुंभलकर,आघाडीचे पदाधिकारी व वंचित उमेदवार संजय केवट व अपक्ष उमेदवार सेवक वाघाये यांना अतिशय कमी मते मिळाल्याने त्याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना झाला. भंडारा व गोंदिया जिल्हयातील महाविकास कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला. सायंकाळी शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. शहरात व ग्रामिण भागात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनिहाय प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जाहीर केल्या. सुरक्षा व्यवस्थेकरीता पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती.