भीषण अपघातात कंटेनरमध्ये जळून एकाचा मृत्यू

दै.लोकजन वृत्तसेवा साकोली :- राष्ट्रीय महामार्गवार मोहघाटा जंगल परिसरात नवीन उड्डाण पुलावर ओव्हरटेक करताना ट्रक व सीएनजी भरलेल्या कंटेनर मध्ये झालेल्या भीषण नपघातात कंटेनर जळाल्याने त्यामध्ये एकाचा जळून मृत्यू झाला. मृतकाचे नाव उत्तर प्रदेश येथील संत रविदास नगर वासी ब्रिजलाल यादव (५३) असे आहे. राष्ट्रीय महामार्गावर संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था ३ तास ठप्प झाली होती. स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस यांच्या प्रयत्नाने अग्निशामक वाहन बोलावून आगीवर नियंत्रण करण्यात आले. मात्र सीएनजी गॅस ने भरलेले कंटेनर पूर्णतः जळाले होते. प्राप्त माहितीनुसार कंटेनर क्रमांक एम. एच. ४० सी. एम.७६९७ सीएनजी गॅस ने भरलेला कंटेनर ट्रक गोंदिया वरून नागपूरकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणारा कांदा भरलेला ट्रक क्रमांक एम. एच. १८ अ.अ. ६९९३ यांच्यामध्ये ओवरटेक करतांना भिषण आग लागली.

या आगीमध्ये कंटेनर मधील ब्रिजलाल यादव (५३) याचा जळून मृत्यू झाला. १८ अ.अ ६९९३ चा ट्रक चालक मनोहर नारायण गायकवाड (३१) जखमी असून, यात उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णाल साकोली येथे भरती करण्यात आले. संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. ठाणेदार रमाकांत कोकाटे महामार्ग पोलीस विभागाचे प्रमोद कुमार बघेले यांच्या चमूने घटनास्थळी अग्निशामक वाहन बोलावून जळत असलेल्या आगीवर नियंत्रण केले. मात्र सीएनजी गॅस भरली असल्याने कंटेनर पूर्णतः जळाले व या आगीत एकाचा मृत्यू झाला. संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार प्रमोद बागडे करीत आहेत